मुंबई - देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सहा महिन्यांच्या कालावधीत तयार करण्यात आला आहे. त्यासाठी टीमने खूप मेहनत घेतल्याचे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी सांगितले.
कृष्णमूर्ती सुब्रमण्यम म्हणाले, गेल्यावेळेस आम्ही खूप मेहनत घेतली. यावेळीही आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. सहा महिन्यात दुसरा आर्थिक पाहणी अहवाल तयार झाला आहे. याचे सर्व श्रेय संपूर्णपणे टीमला जाते.
संबंधित बातमी वाचा- जाणून घ्या, काय असतो आर्थिक पाहणी अहवाल
आर्थिक पाहणी अहवाल २०१९-२० हा संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. सीतारामन दुसऱ्यांदा आर्थिक संकल्प सादर करणार आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेमध्ये अभिभाषण करताना विविध कामांवर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले.
व्हिडिओ पाहा -अर्थसंकल्पाच्या भाषणातील अवघड संज्ञा जाणून घ्या सोप्या भाषेत...