नवी दिल्ली - घाऊक किंमत निर्देशांकातील (डब्ल्यूपीआय) महागाईची फेब्रुवारीमध्ये २.२६ टक्के नोंद झाली आहे. अन्नधान्य आणि पालेभाज्यांचे दर घसरल्याने घाऊक बाजारातील महागाई कमी झाल्याचे सरकारी आकडेवारीमधून समोर आले आहे.
चालू वर्षात घाऊक बाजारपेठेतील महागाई जानेवारीमध्ये ३.१ टक्के होती. तर गतवर्षी जानेवारीमध्ये घाऊक बाजारपेठेतील महागाई ही २.९३ टक्के होती. ही माहिती केंद्रीय ग्रामीण आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे. अन्नधान्याच्या वर्गवारीतील घाऊक किंमत निर्देशांक गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ११.५१ टक्के होता. हे प्रमाण कमी होवून चालू वर्षात फेब्रुवारीत ७.७९ टक्के झाले आहे.