नवी दिल्ली -आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण गेल्या ४५ वर्षात सर्वात अधिक होते. ही बाब मोदी सरकारने फेटाळून लावली होती. मात्र केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीतून ही माहिती सत्य असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण हे ६.१ टक्के होते.
केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांनी संबंधित मंत्रालयाचा आज पदभार घेतला आहे. अशा स्थितीत त्यांच्यासमोरील आव्हाने दाखविणारी आकडेवारी कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहेत.
असे आहे देशातील बेरोजगारीचे प्रमाण-
कामगार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार रोजगारक्षम असेल्या शहरातीत तरुणांमध्ये बेरोजगारीचे ७.८ टक्के प्रमाण आहे. तर ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण ५.३ टक्के आहे. देशातील एकूण बेरोजगारांमध्ये पुरुषांचे ६.२ टक्के प्रमाण आहे. तर बेरोजगारीच स्त्रियांचे ५.७ टक्के प्रमाण आहे.