महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कोरोनाचा पर्यटनासह आदरातिथ्य क्षेत्राला सर्वाधिक फटका - corona impact on travel sector

कोरोनामुळे पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य उद्योगात सेवेत असलेल्या फायनान्शियल प्रोफेशनलच्या नोकऱ्यांवरही परिणाम झाला आहे. पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य उद्योगातील १३ टक्के फायनान्शियल प्रोफेशनल व्यक्तींना विनावेतन काम करावे लागले.

पर्यटन
पर्यटन

By

Published : Feb 17, 2021, 7:55 PM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य उद्योगाला सर्वात मोठा फटका बसला आहे. ही माहिती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्सच्या (आयएमए) अहवालात देण्यात आली आहे.

आयएमएच्या अहवालानुसार मोठ्या कंपन्यांच्या महसुलात मोठी घसरण झाली आहे. असे असले तरी बहुतांश कंपन्यांना स्पर्धकांच्या तुलनेत चांगली कामगिरी झाल्याचे वाटते. तर १० टक्क्यांहून कमी कंपन्यांना स्पर्धकांहून कमी कामगिरी झाल्याचे वाटते. कोरोनामुळे पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य उद्योगात सेवेत असलेल्या फायनान्शियल प्रोफेशनलच्या नोकऱ्यांवरही परिणाम झाला आहे.

हेही वाचा-नवपदवीधरांना नोकऱ्या देण्याकरता कॉर्पोरेट कंपन्या उत्सुक

काय म्हटले आहे अहवालात?

  • पर्यटन, प्रवास आणि आदरातिथ्य उद्योगातील १३ टक्के फायनान्शियल प्रोफेशनल व्यक्तींना विनावेतन काम करावे लागले.
  • ५८ टक्के फायनान्शियल प्रोफेशनल व्यक्तींना वेतन कपातीला सामोरे जावे लागले आहे.
  • सेवाभावी संस्था, शिक्षण क्षेत्र आणि सरकारी क्षेत्रातील व्यावसायिकांना कोरोना महामारीचा सर्वात कमी फटका बसला आहे. या क्षेत्रातील ५ टक्के व्यक्तींना विनावेतन तर ५२ टक्के जणांना वेतन कपातीला सामोरे जावे लागले आहे.
  • आयटी, दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची स्थिती कोरोनाच्या काळातही बळकट राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा-दूरसंचार क्षेत्राकरता १२ हजार कोटींच्या पीएलआय योजनेला केंद्राची मंजुरी

महामारीचा संपूर्ण देशात परिणाम होत असल्याने भारतीय पर्यटन उद्योग दिवाळखोरीत गेला आहे. अनेक व्यवसाय बंद झाल्याने बेरोजगारी वाढत असल्याचे एफएआयटीएचने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मार्च २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details