महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज; ऑपरेशन ग्रीन योजनेला मुदतवाढ

केंद्र सरकारने ऑपरेशन ग्रीनसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज
शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेज

By

Published : May 15, 2020, 7:36 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री यांनी टाळेबंदी दरम्यान राबविण्यात येणारी ऑपरेशन ग्रीन योजनेला मुदतवाढ देण्याचे जाहीर केले. ही योजना टोमॅटो, कांदे आणि बटाटे (टॉप) या फळभाज्या आणि पालेभाज्यांसाठी राबविण्यात येते.

केंद्र सरकारने ऑपरेशन ग्रीनसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हेही वाचा-कृषी उद्योगाला तत्काळ १ लाख कोटींचे पॅकेज जाहीर

योजनेची वैशिष्ट्ये-

  • वाहतुकीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येते.
  • ५० टक्के अनुदान हे साठवण आणि शीतगृहातील साठवणुकीसाठी देण्यात येते.

ऑपरेशन ग्रीन योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अपेक्षा व्यक्त केली. तसेच फळबाज्या व पालेभाज्यांचे नुकसान कमी होणार आहे. तर ग्राहकांना योग्य दरात पालेभाज्या मिळू शकणार आहेत.

हेही वाचा-टाळेबंदीने बेरोजगारीत वाढ; जाणून घ्या, विविध क्षेत्रांवर झालेला परिणाम

ABOUT THE AUTHOR

...view details