महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या चालना देणाऱ्या पॅकेजने अर्थव्यवस्थेला गती व स्थैर्य मिळेल - सीआयआय

सीआयआयचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर म्हणाले, जागतिक व्यापारात संकटे आली असल्याने अर्थव्यवस्था मंदावत असताना सरकारने पॅकेजची घोषणा केली आहे. वित्तीय तुटीचा दबाव न घेता पॅकेज घोषित करण्यात आले.

सीआयआय

By

Published : Aug 25, 2019, 7:37 PM IST

नवी दिल्ली - गेल्या आठवड्यात अर्थव्यवस्थेला चालना देणारे बहुक्षेत्रीय आणि बहुमितीय धोरण घोषित करण्यात आले. त्याचा अर्थव्यवस्थेला चालना व स्थैर्य मिळण्यासाठी चांगला फायदा होईल, असे उद्योगाची प्रतिनिधीत्व करणारी संघटना सीआयआयने म्हटले आहे.

सीआयआयचे अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर म्हणाले, जागतिक व्यापारात संकटे आली असल्याने अर्थव्यवस्था मंदावत असताना सरकारने पॅकेजची घोषणा केली आहे. वित्तीय तुटीचा दबाव न घेता पॅकेज घोषित करण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सहा मितीय असलेल्या घोषणांच्या मदतीने खऱ्या अर्थाने षटकार ठोकला आहे. येत्या काळात अर्थव्यवस्थेला गती येईल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी या केल्या आहेत घोषणा -

एमएसएमई सर्व जीएसटी परतावे ३० दिवसात परत मिळणार आहेत. यामध्ये सहा महिने व एक वर्षापासून रखडलेल्या प्रकरणाचा समावेश आहे. जीएसटीच्या नव्या प्रकरणातील परतावे हे ६० दिवसात मिळणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पायाभूत क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी नव्या संस्थेची स्थापना करण्यात येणार असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details