महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या दराचे प्रमाणीकरण करण्यावर सरकारचा विचार सुरू

रुपयाची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण हेदेखील सोन्याच्या किमती वाढण्याचे कारण आहे. जर सोन्याच्या किमती व्यस्थापन केले नाही तर चलानाच्या विनिमय दरावर परिणाम होईल, असेही केंद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडे म्हणाले.

संग्रहित - सोन्याचे दर

By

Published : Sep 2, 2019, 1:01 PM IST

चेन्नई - सोन्याचे दर सातत्याने वाढत असताना त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार काही पावले उचलणार असल्याचे केंद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी सांगितले. सोन्याचे प्रमाणीकरण करण्याची गरज आहे, त्याबाबत विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

सोन्याच्या किमतीचे मुद्रीकरण (मॉनेटियाझेशन) योजना करण्याची योजना असल्याबाबत विचारले असता अजय भूषण पांडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, एका मालमत्तेमधून (असेट्स) दुसऱ्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याचे अजय भूषण पांडे सांगितले. अमेरिका, जपान आणि शांघायमधील शेअर बाजार हा घसरत आहे. जर गुंतवणुकीमधून कमी परतावा मिळत असेल तर गुंतवणूक दुसऱ्या मालमत्तेमध्ये केली जाते. ही जगभरात गुंतवणूकदारांची सर्वसामान्य वृत्ती आहे. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढत असल्याचे पांडे यांनी सांगितले.

संग्रहित - सोन्याचे दर

रुपयाची डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण हेदेखील सोन्याच्या किमती वाढण्याचे कारण आहे. जर सोन्याच्या किमतीचे व्यस्थापन केले नाही. तर, चलानाच्या विनिमय दरावर परिणाम होईल, असेही ते म्हणाले. त्यासाठी आपल्याला खूप संतुलन साधावे लागणार आहे.

सोन्याची किंमत कशी निश्चित करायची हा प्रश्न आहे. जर लोकांच्या ताब्यात सोने असेल तर, त्याचे प्रमाणीकरण निश्चित करता येणार नाही. मुद्रीकरणासाठी सोन्याचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे. जर २२ कॅरेट व १८ कॅरेट सोन्याचे दागिने एकत्रित केले तर प्रमाणीकरणाची अडचण निर्माण होते. याबाबत तोडगा काढावा लागणार आहे. यावर सध्या आम्ही विचार करत आहोत, असे पांडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details