नवी दिल्ली - काही ई-कॉमर्स कंपन्या बाजार प्रभावित करणाऱ्या किमती निश्चित करण्याचा मनमुराद आनंद घेत असल्याची केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी टीका केली. त्याचा लाखो लहान विक्रेत्यांवर (रिटेलर्स) विपरित परिणाम होत असल्याचेही गोयल म्हणाले. ते ब्राझिलियामधील ब्रिक्स वाणिज्य मंत्र्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.
पियूष गोयल म्हणाले, ई-कॉमर्स कंपन्यांनी कायद्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. डिजीटल पायभूत व्यवस्था, डिजीटल कौशल्य, संस्था या विशेषत: विकसनशील आणि कमी विकसित देशांमध्ये विकसित करण्याची गरज आहे. पुढे ते म्हणाले, संरक्षणवाद वाढत असताना जागतिक आर्थिक रचना ही गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे. एकतर्फी सुधारणा केल्या जात असताना व्यापारी तणाव वाढत आहेत. अशा अनिश्चिततेच्या जगात भारताने आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यात सातत्य ठेवले आहे. केंद्र सरकारने गुंतणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा-'राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करून 'ई-नाम'चा स्वीकार करावा'