महाराष्ट्र

maharashtra

सोमा रॉय बर्मन यांची महालेखा नियंत्रकपदी नियुक्ती

By

Published : Dec 2, 2019, 6:25 AM IST

सोमा रॉय बर्मन यांनी ३३ वर्षाच्या कारकीर्दीत गृह मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, उद्योग मंत्रालय, वित्त मंत्रालय, मानव संसधान विकास मंत्रालय आणि रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयात विविध पदावर काम केले आहे.

Soma Roy Burman
हालेखा नियंत्रक, सोमा रॉय बर्मन

नवी दिल्ली -केंद्र सरकारने १९८६ च्या बॅचमधीन भारतीय नागरी लेखा सेवा अधिकारी सोमा रॉय बर्मन यांची महालेखा नियंत्रकपदी नियुक्ती केली आहे. त्या जे. पी. एस. चावला यांच्याजागी रुजू होणार आहेत. महालेखा नियंत्रक पदावर पोहोचलेल्या त्या सातव्या महिला आहेत.

बर्मन यांच्या नियुक्ती १ डिसेंबर २०१९ पासून लागू होणार असल्याचे केंद्रीय वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. बर्मन यांनी ३३ वर्षाच्या कारकीर्दीत गृह मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, उद्योग मंत्रालय, वित्त मंत्रालय, मानव संसधान विकास मंत्रालय आणि रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयात विविध पदावर काम केले आहे. यापूर्वी त्या अतिरिक्त महालेखा नियंत्रक पदावर कार्यरत होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details