मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प( Union Budget 2022 ) सादर केला आहे. या अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारातील तज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांनी ( Share Market investors opinion on Budget 2022 ) संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्प चांगला असला तरी सामान्य नागरिकांकरिता करामध्ये कोणतेही बदल केले नसल्याने बाजार गुंतवणूकदारांनी ( No tax relief in Budget ) नाराजी व्यक्त केली आहे. क्रिप्टो चलनावर 30 टक्के कर लावल्याचे गुंतवणूकदारांनी ( Investors welcome tax on crypto currency ) स्वागत केले आहे.
सामान्य लोकांना दिलासा-
भांडवली खर्च, पायाभूत सुविधा आणि डिजीटल सुविधा यावर जोर दिला आहे. २० हजार करोड हायवे, ४८ प्रधानमंत्री आवाज योजना आणि ६० हजार कोटी रुपये पिण्याच्या पाण्यावर खर्च केले जाणार आहेत. नवीन ४०० वंदे मातरम रेल्वे सुरू केल्या जाणार आहेत. विदेशी गुंतवणूक वाढेल. प्राप्तीकराच्या वर्गवारीत ( Income tax slab ) कोणतेही बदल केले नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे. गृहकर्ज घेणाऱ्या लोकांना दिलासा दिला जाईल, असे वाटत होते. मात्र असे काहीही या अर्थसंकल्पात नाही अशी प्रतिक्रिया तज्ज्ञ आणि बाजार गुंतवणूकदार चेतन दमाणी यांनी दिली आहे.
बाजार तज्ज्ञांकडून अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया हेही वाचा-Union Budget 2022 : वाचा काय स्वस्त, काय महाग.. बजेटमध्ये नागरिकांना दिलासा?
शेअर बाजारासाठी चांगला अर्थसंकल्प
शेअर बाजारासाठी हा चांगला अर्थसंकल्प आहे. दीर्घकाळ गुंतवणुकीकरिता निधी वाढवला जाईल, अशी चर्चा होती. मात्र असे काही झालेले नाही. यामुळे बाजार वर गेले आहे. आज केलेल्या घोषणेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केल्यास येत्या दिवसात लोकांना नोकऱ्या मिळतील. तसेच आर्थिक विकास होऊ शकतो. ऑप्टिकल फायबरसाठी पीपीपी कंपन्यांकडून काम केल जाणार आहे. यामुळे वेळेत काम होवून लोकांना ५ जी आणि इतर सेवा मिळणार आहेत, असे शेअर बाजार गुंतवणूकदार सिद्धार्थ पुवावाला यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-Union Budget 2022 : आरोग्य क्षेत्रासाठी आजचा अर्थसंकल्प कल्पना शून्य आणि निराशाजनक - आरोग्य तज्ज्ञ
क्रिप्टो चलनावरील कराचे स्वागत -
पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प आहे. भविष्यात ग्रामीण आणि शहरातील सरकारी शाळा खासगी शाळांना टक्कर देत नाहीत. या शाळांना मदत करण्यासाठी २०० चॅनेल सुरू केले जाणार आहेत. एका वर्गासाठी एका चॅनेल असेल. शाळांमध्ये स्क्रीन लावून शिक्षण दिले जाईल. डिजिटल विद्यापीठ , ५ जी लॉन्च केले जाणार आहे. डेटाचा स्पीड वाढेल. सरकार जे काही करते ते लोकांसाठी करते. गेले दोन वर्षे कोरोनाच्या महामारीत गेले आहेत. या दरम्यान ७० टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. या लसी मोफत दिल्या आहेत. लोकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. यात सरकारचा पैसा खर्च होत आहे. याचा समतोल राखण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. क्रिप्टोचलन सामान्य चलन नाही. यात मोठ्या प्रमाणात चढ उतार असतो. गेल्या एका ते दोन महिन्यात ४०० ते ५०० कोटींची उलाढाल झाली आहे. हा एक सट्ट्यासारखा प्रकार आहे. भारतात गरीब लोक राहतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ३० टक्के कर लावला आहे. त्यावर टीडीएस लावला आहे. लोकांचे नुकसान होऊ नये म्हणून हा कर लावण्यात आल्याचे बाजार तज्ज्ञ ए. पी. शुक्ला यांनी सांगितले.
हेही वाचा-Union Budget 2022 : जाणून घ्या, केंद्रीय अर्थसंकल्पातील अत्यंत महत्त्वाच्या घोषणा
लॉलीपॉप दिलेले नाही -
सरकारने नागरिकांना जे पाहिजे ते दिले आहे. लॉलीपॉप दिलेले नाही. नागरिकांना करांमध्ये सवलत हवी होती. मात्र ती मिळालेली नाही. आर्थिक विकासाला आणि व्यवसायाला मजबूत करेल असा हा अर्थसंकल्प आहे. शिक्षणासाठी वन क्लास वन चॅनेल, मार्केटसाठी वन स्टेशन वन प्रोडक्ट केले आहे. डिजिटलायझेशनवर भर दिला आहे. प्राप्तिकरदात्यांना काहीही दिले नाही. असे असले तरी उत्पादक आणि इतरांना खूप काही दिले आहे. आज सकाळी शेअर बाजार वाढला होता. अर्थसंकल्पामध्ये कराबाबत घोषणा करेपर्यंत शेअर बाजारात उत्साह होता. यामुळे तो ९३० पॉईंटवर गेला. त्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक ४०० पर्यंत खाली आला आहे. मिक्स आणि बॅलन्स बजेट आहे, अशी प्रतिक्रिया सीए आणि शेअर मार्केट एक्स्पर्ट असलेले पंकज जैस्वाल यांनी दिली आहे.