मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २०० अंशाने वधारला. धातू, ऑटो, आयटी आणि उर्जा कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २१४.५१ अंशाने वधारून ४१,१८१.३७ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ही ७१.३५ अंशाने वधारून १२,१२७ वर पोहोचला.
हेही वाचा-आर्थिक पुनरुज्जीवनासाठी मूळ 'एफआरबीएम' कायद्याची अंमलबजावणी..
या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले-
टाटा स्टीलचे सर्वाधिक २ टक्क्यांनी शेअर वधारले. त्यापाठोपाठ इन्फोसिस, एम अँड एम, भारती एअरटेल, मारुती आणि हिरो मोटोकॉर्पचे शेअर वधारले.
टीएसीएस, एचडीएफसीचे शेअर घसरले.
हेही वाचा-भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या खोल गर्तेत; अर्थसंकल्पाकडून आशा नाहीत'
येत्या अर्थसंकल्पात चालना देणारे निर्णय घेण्यात येतील, या अपेक्षेने शेअर बाजार निर्देशांक वधारल्याचे ट्रेडर्सने सांगितले. मागील सत्रात मुंबई शेअर बाजार १८८.२६ अंशाने घसरून ४०,९६६.८६ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ६३.२० अंशाने घसरून १२,०५५.८० वर स्थिरावला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १,३५७.५६ कोटी रुपयांच्या शेअरची मंगळवारी विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ७११.७० कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली