नवी दिल्ली - थेट विदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) प्रमाण हे जुलै ते सप्टेंबर २०२० मध्ये प्रमाण वाढून २८.१ अब्ज डॉलर राहिले आहे. देशातील वातावरणामुळे जगभरातील गुंतवणुकदारांनी भारताला प्राधान्य दिल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले आहे.
गतवर्षी सप्टेंबरच्या तिमाहीत १४.०६ अब्ज डॉलरची गुंतवणूक राहिली होती. पियूष गोयल यांनी ट्विट करून देशात थेट विदेशी गुंतवणूक वाढल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की कोरोनाच्या काळातही एफडीआयचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील असलेल्या वातावरणामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी देशामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याचे सूचित होत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत एफडीआयचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे.
संबंधित बातमी वाचा-दिलासादायक! महामारीत एप्रिल ते सप्टेंबरमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीत १५ टक्क्यांनी वाढ