नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये व्यापारी वर्गाचा समावेश केला नाही. यामुळे अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) तीव्र निराशा व्यक्त केली आहे. व्यवसाय बंद करू, असा असा संघटनेने इशाराही दिला आहे.
आर्थिक पॅकेजमध्ये व्यापारी वर्ग आणि किरकोळ विक्रेत्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. देशातील ७ कोटी व्यापाऱ्यांची आर्थिक पॅकेजमध्ये दखल घेतली नसल्याने खूप निराश आहोत, असे सीएआयटीने म्हटले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीएआयटीचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी केली आहे.