महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

किरकोळ बाजारातील महागाईत एप्रिलमध्ये २.९२ टक्क्यांची वाढ

भारतीय रिझर्व्ह बँक ही पतधोरण जाहीर करताना प्रामुख्याने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असलेल्या महागाईच्या आकडेवारीचा विचार करते.

किरकोळ बाजार

By

Published : May 13, 2019, 7:23 PM IST

नवी दिल्ली - अन्नाच्या किंमती वाढल्याचा फटका किरकोळ बाजाराला बसला आहे. एप्रिलमध्ये किरकोळ बाजारातील वस्तुंच्या किंमती २.९२ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने महागाईची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार अन्नाच्या किंमती या मार्चमध्ये ०.३ टक्क्याने महागल्या होत्या. तर त्यात एप्रिलमध्ये वाढ होवून त्या १.१ टक्क्याने महागल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक ही पतधोरण जाहीर करताना प्रामुख्याने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असलेल्या महागाईच्या आकडेवारीचा विचार करते.

ABOUT THE AUTHOR

...view details