मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक एप्रिलऐवजी ३ जून ते ५ जूनदरम्यान होणार आहे. नव्या आर्थिक वर्षातील पतधोरण समितीची ही पहिली बैठक असणार आहे.
साधारणत: आरबीआयच्या पतधोरण समितीची पहिली बैठक ही दरवर्षी एप्रिलमध्ये होते. मात्र, कोरोनाचे संकट पाहता अभूतपूर्व स्थिती असल्याने पतधोरण समितीची बैठक जूनमध्ये घेण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला.
हेही वाचा-विजय मल्ल्याला भारतात आणायचा मार्ग मोकळा, कारण...
बँकांची बँक म्हणून काम करणाऱ्या आरबीआयला वर्षभरात किमान चार पतधोरण समितीच्या बैठका घ्याव्या लागतात. मात्र, पतधोरण समितीने कोरोनाच्या संकटामुळे मार्चमध्ये अचानक बैठक घेतली. या बैठकीत रेपो दर ७५ बेसिसने कमी करू ४.४० टक्के केला होता. तर रिव्हर्स रेपो दर हा ९० बेसिस पाँईटने कमी करून ४ टक्के केला होता.
हेही वाचा-'या' कंपन्यांमुळे शेअर बाजाराची टळली घसरण