मुंबई -भारतीय रिझर्व्ह बँकेने राखीव साठ्यातील सोने विक्री केल्याचे वृत्त फेटाळले आहे. आरबीआयने कोणत्याही सोन्याची विक्री अथवा त्याचा व्यवहार केले नसल्याचे स्पष्ट केले.
आरबीआयकडील सोन्याचा राखीव साठा कमी असल्याची आकडेवारी समोर आली होती. त्यानंतर बँकेकडून सोन्याची विक्री झाल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. यावर आरबीआयने खुलासा करणारे ट्विट केले आहे.
हेही वाचा-धर्म पाहून फूड डिलिव्हरी घेण्यास नकार देणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल
आरबीआयकडून दर आठवड्याला बँकेकडील असलेल्या सोन्याची आकडेवारी जाहीर केले जाते. यामध्ये सोन्याच्या साठ्यामध्ये दिसून येणार फरक हा सोन्याच्या कमी झालेल्या किमतीमुळे दिसत असल्याचे बँकेने ट्विटमध्ये केले आहे. या सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारामधील सोन्याचे दर आणि विनिमय मुल्याप्रमाणे (एक्सचेंज रेट) बदलत असतात.
हेही वाचा-तीन दशकानंतर प्रथमच आरबीआयकडून राखीव सोने साठ्याची विक्री
माध्यमातील वृत्तात आरबीआयने ५.१ अब्ज डॉलरच्या सोन्याची खरेदी केल्याचे म्हटले होते. तर १.१५ अब्ज डॉलरच्या सोन्याची विक्री केल्याचे म्हटले होते. यापूर्वी १९९१ ला आरबीआयने सोन्याची विदेशी बँकांना विक्री केली होती. त्यावेळी विदेशी गंगाजळीचा साठा कमी राहिला होता.