मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँक जूनमध्ये आणखी रेपो दर कमी करण्याची शक्यता आहे. याबाबतची शक्यता लंडनमधील आयएचएस मार्किटने अहवालात व्यक्त केली आहे. वित्तीय तुटीच्या वाढत्या दबावामुळे जूननंतर आरबीआय रेपो दर कमी करू शकणार नाही, असेही अहवालात म्हटले आहे.
आरबीआय जूनमध्ये रेपोदरात पुन्हा कपात करण्याची शक्यता
आयएचएस मार्किटच्या अहवालानुसार आरबीआय पुढील आर्थिक वर्षापर्यंत पतधोरणाचे कठोर नियम करण्याची शक्यता आहे.
आरबीआय
आरबीआयच्या पतधोरण समितीने फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये रेपो दरात ०.२५ टक्के कपात केली होती. आयएचएस मार्किटच्या अहवालानुसार आरबीआय पुढील आर्थिक वर्षापर्यंत पतधोरणाचे कठोर नियम करण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पतधोरणातील सौम्य भूमिका आणि कर्ज देण्याचे शिथील नियम यामुळे आर्थिक विकासाला गती मिळाली आहे. जूननंतर अन्नाच्या किंमती वाढतील, अशी शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.