नवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातील अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. उपभोगतेमधून अर्थव्यस्था पुन्हा सुरू होण्यासाठी गरीबांना पैसे देण्याची गरज असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.
'सरकारने कर्ज देण्याची नव्हे अधिक पैसे खर्च करण्याची गरज' - latest Rahul Gandhi news
अर्थव्यवस्थेमधील मागणीत सुधारणा होण्यास वेळ लागणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी म्हटले आहे. यंदाच्या मागणीचे मूल्यांकन केले असता मागणीवर मोठा परिणाम होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
अर्थव्यवस्थेमधील मागणीत सुधारणा होण्यास वेळ लागणार असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने मंगळवारी म्हटले आहे. यंदाच्या मागणीचे मूल्यांकन केले असता मागणीवर मोठा परिणाम होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. गांधींनी ट्विटमध्ये म्हटले, की गेल्या काही महिन्यांपासून आम्ही म्हणत होतो, त्याला आरबीआयने पुष्टी दिली आहे. सरकारला अधिक खर्च करण्याची गरज आहे. अधिक कर्ज देण्याची गरज नाही. माध्यमातून असलेल्या अडथळ्यांनी गरिबांना मदत होत नाही. तसेच आर्थिक संकट दूर होत नाही, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. गरिबांना पैसे द्या, उद्योजकांच्या करात कपात करू नका, अर्थव्यवस्थेमधील उपभोगत्याचे प्रमाण पुन्हा सुरू करा, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
शाश्वत अर्थव्यवस्थेचा दर गाठण्यासाठी आणि नुकसान टाळून महसूल वाढविण्यासाठी मोठ्या सुधारणांची गरज आरबीआयने वार्षिक अहवालात व्यक्त केली आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासदरात मोठी घसरण होईल, असा अंदाज यापूर्वीच आरबीआयने व्यक्त केला आहे.