महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 20, 2020, 1:46 PM IST

ETV Bharat / business

राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता पुण्याची 'थिंक टँक' सूचविणार कृती कार्यक्रम

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमेवत शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर व इतर तज्ज्ञांची अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नुकतीच बैठक झाली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाची माहिती द्यावी, अशी मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांना सूचना केली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

पुणे -कोरोना महामारीतून राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व तज्ज्ञांची समिती राज्य सरकारला कृती कार्यक्रम सूचविणार आहे. प्रत्यक्ष कृती कार्यक्रमातून अर्थव्यवस्थेला लघु, मध्यम व दीर्घ कालावधीसाठी चालना मिळण्यासाठी सरकारला माहिती मिळू शकेल, असे डॉ. माशेलकर यांनी दिली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमेवत शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर व इतर तज्ज्ञांची अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नुकतीच बैठक झाली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाची माहिती द्यावी, अशी मुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञांना सूचना केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीला प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ विजय केळकर, एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख, माजी राजदूत विजय गोखल, गौतम बंबवाले आणि पीआयसीचे सदस्य उपस्थित होते. याबाबत माहिती देताना डॉ. माशेलकर म्हणाले, की पीआयसीचे तज्ज्ञ, मुख्य सचिव आणि इतर अधिकारी हे कृती कार्यक्रम तयार करणार आहेत. पीआयसीचे सदस्य हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. सरकारला दिलेल्या शिफारशीमध्ये कृषी, उद्योग, शिक्षण आणि क्षेत्रातील धोरणांचा समावेश आहे. जानेवारीत मुख्यमंत्र्यांना दिलेला शिफारशींचा अहवाल आवडला होता, असे माशेलकर यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट सुरू झाले असताना मुख्यमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तज्ज्ञांकडून शिफारशी मागविल्या होत्या. त्यानंतर अर्थव्यवस्था सावरण्यासाठी विदेशी गुंतवणूक आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजना पीआयसीने सुचविल्या आहेत. विकासदर वाढविण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रकल्पांना चालना देण्याची शिफारसही केली आहे. कोकणातील रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याचे सूचविले आहे. त्यामधून 1 लाख लोकांना रोजगार मिळू शकणार आहे. तर 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकणार आहे. माशेलकर म्हणाले, की आम्ही स्थावर मालमत्ता, मोठे प्रकल्प आणि उद्योगानुकूलतेमध्ये सुधारणा यावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दिलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे शास्त्रज्ञ माशेलकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details