महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पंतप्रधानांकडून सर्वपक्षीय बैठक बोलाविली जाणार असल्याची शक्यता

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वपक्षीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बैठक घेण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

By

Published : Jan 30, 2021, 12:24 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्यापूर्वी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याची शक्यता आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय आज बैठक घेण्याची शक्यता असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. सुत्राच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ फेब्रुवारीला संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.

हेही वाचा-अर्थसंकल्पाच्या अंदाजाहून वित्तीय तुटीत १४५.८ टक्क्यांची वाढ

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रपतींनी अभिभाषण केल्यानंतर त्यांचे आभार मानण्याच्या ठरावात ही चर्चा करता, येईल, असे सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना सूचविले आहे. लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी संसदेचे कामकाज सुरळितपणे चालू राहण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. प्रत्येक सदस्यांना बोलण्याची संधी देईल, असे बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना आश्वासन दिले आहे.

हेही वाचा-'स्पूटनिक व्ही' मार्चमध्ये लाँच करण्याचा डॉ. रेड्डीजचा प्रयत्न

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेमध्ये सादर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details