नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने ५०० व २ हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. या नोटांची साठेबाजी केली जात आहे. त्यामुळे २ हजार रुपयांची नोट बंद करावी, असे मत माजी केंद्रीय अर्थव्यवहार सचिव एस. सी. गर्ग यांनी व्यक्त केले. नोटाबंदीच्या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण होत असतानाच गर्ग यांनी हे विधान केले आहे.
एस. सी. गर्ग म्हणाले, अजूनही व्यवस्थेत मोठी रोकड आहे. २ हजार रुपयांच्या नोटांचा साठा केला जात असल्याचे पुरावे आहेत. जगभरात डिजीटल व्यवहारांचे प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये त्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, ही गती खूप कमी आहे. चीनमध्ये ८७ टक्के व्यवहार हे बिगर रोखीने होतात. तर भारतात बिगर रोखीच्या व्यवहाराचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे.
हेही वाचा-मूडीजने घटविले देशाचे पतमानांकन; आर्थिक जोखीम वाढवित असल्याचे नोंदविले निरीक्षण