नवी दिल्ली- अबकारी शुल्क आणि उपकर वाढल्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. असे असले तरी रेल्वेच्या तिकिटांचे दर वाढविण्याचा प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी राज्यसभेत सांगितले.
पेट्रोलियम उत्पादनाच्या वाढत्या किमतीने प्रवाशांवर आणि तिकिट दरावर काय परिणाम झाला, असा प्रश्न काँग्रेसचे नेते बी.के.हरिप्रसाद यांनी रेल्वेमंत्र्यांना प्रश्नोत्तराच्या तासात विचारला. यावर उत्तर देताना पियूष गोयल म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून रेल्वेकडून डिझेलचा वापर कमी होत आहे. रेल्वे मंत्रालय २०२२ पर्यंत १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे नियोजन करत असल्याचे त्यांनी सांगितले.