महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जीडीपीची आकेडवारी निश्चित करण्यात सरकार 'हा' मोठा बदल करणार - आधार वर्ष

जीडीपी निश्चित करण्यासाठी २०१७-१८ हे आधार वर्ष करण्याचा विचार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी (एमओएसपीआय) मंत्रालयाचा आहे. याबाबत अद्याप, कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.  तज्ज्ञांच्या समिती त्यासाठी काही नवीन प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीची प्रतिक्षा करत आहेत.

जीडीपी

By

Published : Nov 5, 2019, 7:09 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने जीडीपी (राष्ट्रीय सकल उत्पन्न) निश्चित करणारे आधार वर्ष (बेस इयर) बदलण्याचे निश्चित केले आहे. ही माहिती एमओएसपीआयचे सचिव प्रविण श्रीवास्तव यांनी माध्यमांना दिली. ते फिक्कीच्या परिषदेत बोलत होते.

जीडीपी निश्चित करण्यासाठी २०१७-१८ हे आधार वर्ष करण्याचा विचार केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी (एमओएसपीआय) मंत्रालय आहे. याबाबत अद्याप, कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तज्ज्ञांच्या समिती त्यासाठी काही नवीन प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीची प्रतिक्षा करत आहेत.

हेही वाचा-पीएमसी खातेदारांना आरबीआयकडून किंचित दिलासा; पैसे काढण्याच्या मर्यादेत 'एवढी' केली वाढ


येत्या काही महिन्यात जीडीपी निश्चित करणारे आधार वर्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी उद्योगांचे वार्षिक सर्व्हे आणि ग्राहक खर्च सर्व्हेची प्रतिक्षा करत असल्याचे प्रविण श्रीवास्तव यांनी सांगितले. आकडेवारी जाहीर होताच, ती संबंधित समितीसमोर आधार वर्ष बदलण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या जीडीपी काढण्यासाठी २०११-१२ हे आधार वर्ष गृहित धरण्यात येत आहे.

हेही वाचा-सोन्याच्या मागणीत ३२ टक्क्यांची घट; वाढत्या किमतीसह मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा परिणाम

काय आहे जीडीपीचे आधार वर्ष-

ज्या वर्षाच्या तुलनेत जीडीपी काढण्याच्या वर्षाची तुलना केली जाते, त्याला आधार वर्ष म्हटले जाते. काही वर्षानंतर तंत्रज्ञान, मागणी इत्यादी कारणांनी आर्थिक बदल होतात. त्यामुळे साधारणत: आधार वर्ष बदलण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details