नवी दिल्ली -मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने देशाचे पतमानांकन घटविल्यानंतर दुसरा एक धक्का दिला आहे. मूडीजने देशाच्या सकल उत्पन्नाचा (जीडीपी) विकासदर हा पूर्वीच्या अंदाजाप्रमाणे ५.८ टक्के न राहता ५.६ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. अपेक्षेहून अधिक काळ मंदी राहिल्याने मूडीने आपल्या जीडीपीच्या अंदाजात बदल केला आहे.
वर्ष २०२० मध्ये आर्थिक चलवलनाला गती मिळेल, अशी मूडीजने अपेक्षा व्यक्त केली. देशाचा जीडीपी २०२० मध्ये ६.६ टक्के तर २०२१ मध्ये जीडीपी ६.७ टक्के राहील, असा मूडीजने अंदाज व्यक्त केला आहे. असे असले तरी मागील वर्षांच्या तुलनेत विकासदर कमी राहील, असे मूडीजने म्हटले आहे.
हेही वाचा-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे थकित रक्कम भरा; सरकारची दूरसंचार कंपन्यांना नोटीस
वर्ष २०१८ च्या मध्यावधीत भारतीय आर्थिक विकासाचा दर घसरला आहे. वास्तविक राष्ट्रीय सकल उत्पन्न (रिअल जीडीपी) हा दुसऱ्या तिमाहीत ८ टक्क्यांवरून ५ टक्के झाला. देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. उपभोक्त्यांची मागणी कमी झाल्याने सध्याची अर्थव्यवस्था मंदावल्याचे मूडीजे म्हटले आहे.
हेही वाचा-रिक्स परिषद : भारत ही जगातील सर्वात खुली, गुंतवणूक स्नेही अर्थव्यवस्था - पंतप्रधान
मूडीजने नुकतेच घटविले आहे पतमानांकन-
मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने देशाचे पतमानांकन 'स्थिर'ऐवजी 'नकारात्मक' असे केले आहे. सरकार आर्थिक प्रश्नांवर मात करण्यासाठी अंशत: निष्प्रभ ठरल्याचे मूडीजने म्हटले आहे. याचा परिणाम म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील आर्थिक जोखीम वाढत आहे. देशाचा विकासदर गतवर्षीहून अंशत: कमी राहणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे.