महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

जाणून घ्या, अर्थसंकल्पात वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या संज्ञा

अर्थसंकल्पात सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून काही संज्ञांचा उल्लेख करण्यात येतो. अर्थशास्त्राशी निगडीत संज्ञांचा अर्थ माहित नसेल तर अर्थसंकल्प समजणे कठीण जाते. तेव्हा या महत्त्वाच्या काही संज्ञांचा अर्थ माहित करून घेणे आवश्यक आहे.

अर्थसंकल्प
अर्थसंकल्प

By

Published : Jan 30, 2021, 7:35 AM IST

नवी दिल्ली-- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर करताना वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या संज्ञांचा अर्थ सोप्या शब्दात जाणून घ्या.

अर्थसंकल्पात सादर करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून काही संज्ञांचा उल्लेख करण्यात येतो. अर्थशास्त्राशी निगडीत संज्ञांचा अर्थ माहित नसेल तर अर्थसंकल्प समजणे कठीण जाते. तेव्हा या महत्त्वाच्या काही संज्ञांचा अर्थ माहित करून घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा-'मल्टी कमोडिटी एक्सचेंज'मधून सोने-चांदीचा व्यापार वगळावा; सुवर्ण व्यावसायिकांची अपेक्षा

  1. जीडीपी (राष्ट्रीय सकल उत्पादन) - एखाद्या भूप्रदेशात विशिष्ट कालावधीत, सामान्यत: वर्षामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे अंतिम मूल्य हे जीडीपी असते. यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचा विकासदर समजतो.
  2. वित्तीय तूट (फिस्कल डिफिशियट) - सरकारकडील एकूण महसूल आणि एकूण खर्च यामधील फरक ही वित्तीय तूट म्हणून ओळखली जाते. यामुळे सरकारला कामकाजासाठी किती कर्ज घ्यावे लागणार हे समजू शकते.
  3. वित्तीय विधेयक (फिस्कल बिल) - कर लागू करणे, कर वगळणे आणि प्रस्तावित करातील नियमन याचा सविस्तर समावेश असणारा अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. त्यानंतर तातडीने विधेयक संसदेमध्ये आणले जाते. हे विधेयक वित्तीय विधेयक म्हणून ओळखले जाते.
  4. प्रत्यक्ष कर (डायरेक्ट टॅक्स) - हा कर व्यक्तीला अथवा संस्थांच्या उत्पन्नावर लागू करण्यात येतो.
  5. अप्रत्यक्ष कर (इनडायरेक्ट टॅक्स) हा कर ग्राहकाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूवर आणि सेवांवर लागू करण्यात येतो. जीएसटीसारखे कर हे अप्रत्यक्ष करात लागू करण्यात येतात.
  6. वित्तीय धोरण (फिस्कल पॉलिसी) - सरकारी कर्ज, वित्तीय तूट आणि कर प्रणालीशी संबंधित धोरण तयार केले जाते.
  7. सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) - हा कर निर्यात आणि आयात करण्यात येणाऱ्या वस्तूवर केंद्र सरकारकडून लागू करण्यात येतो.
  8. अनुदान (सबसिडी) - लोकांना अथवा एखाद्या वर्गाला कल्याणकारक हेतू ठेवून अनुदान दिले जाते. तसेच विविध गोष्टींना प्रोत्साहन म्हणून अनुदान दिले जाते.
  9. उपकर (सेस) - विशिष्ट उद्देश ठेवून हा उपकर लावण्यात येतो. उदा. स्वच्छता अभियान, कृषी कल्याण यासाठी उपकर लावण्यात येतो.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनेचा पहिले सत्र १५ फेब्रुवारीऐवजी १३ फेब्रुवारीला संपण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले आहे. असे असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा कार्यकाळ तेवढाच राहणार आहे.

हेही वाचा-आठ पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनात डिसेंबरमध्ये १.३ टक्क्यांची घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details