महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 27, 2020, 3:54 PM IST

ETV Bharat / business

टाळेबंदीत बेरोजगारीचे प्रमाण २४ टक्क्यांहून अधिक - सीएमआयई अहवाल

टाळेबंदीच्या आठ आठवड्यात बेरोजगारीचे सरासरी प्रमाण हे २४.२ टक्के राहिले आहे. हे प्रमाण आणखी वाढत आहे.

बेरोजगारीचे वाढते प्रमाण
बेरोजगारीचे वाढते प्रमाण

नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे देशातील बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. सेंटर फॉर मॉनरटिंग इंडियन मॉनिटरटिंगने (सीएमआयई) २४ मेअखेरीच्या अहवालात बेरोजगारीचा प्रमाण २४.३ टक्के राहिल्याचे म्हटले आहे. त्यापूर्वीच्या आठवड्यात बेरोजगारीचे प्रमाण होते.

टाळेबंदीच्या आठ आठवड्यात बेरोजगारीचे सरासरी प्रमाण हे २४.२ टक्के राहिले आहे. हे प्रमाण आणखी वाढत आहे. मार्चमधील बेरोजगारीचे प्रमाण हे ८.८ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये २३.५ टक्के झाले आहे. हे बेरोजगारीचे प्रमाण मेमध्ये २४ टक्के स्थिर राहिले. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा-दिलासादायक! ट्रॅक्टर तयार करणाऱ्या 'या' कंपनीकडून व्हेटिंलेटर विकसित

सीएमआयईच्या ग्राहक पिरॅमिड कौटुंबिक सर्वेक्षणानुसार कामगार मनुष्यबळात कमालीची घसरण झाली आहे. एप्रिल २०१९-२० ते एप्रिल २०२०-२१ या कालावधीत ६८ दशलक्ष मनुष्यबळात कपात झाली आहे. हे मनुष्यबळ नोकरीच्या शोधात असल्याचे सीएमआयईने म्हटले आहे.

हेही वाचा-गुगलची कार्यालये 'या' दिवशीपासून होणार सुरू; कर्मचाऱ्यांना अतिरिक्त हजार डॉलर

ABOUT THE AUTHOR

...view details