नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षामधील एप्रिल-जूनच्या कालावधीत एकूण औद्योगिक उत्पादन दर ३ टक्के नोंदविण्यात आला आहे. तर गेल्या वर्षी एप्रिल-जूनदरम्यान ५.९ टक्के एकूण औद्योगिक उत्पादन दर होता. देशाचे एकूण औद्योगिक उत्पादन हे २.९ टक्क्यांनी घसरल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
देशातील महत्त्वाच्या ८ औद्योगिक क्षेत्रांचे उत्पादन घसरले आहे. जुलैमध्ये २.१ टक्के औद्योगिक उत्पादन नोंद झाली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये ७.३ टक्के औद्योगिक उत्पादन झाले होते. तर जूनच्या तुलनेत जुलैमध्ये महत्त्वाच्या ८ औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनात केवळ ०.७ टक्के वाढ झाली आहे.
हेही वाचा-उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत घसरण; गेल्या १५ महिन्यात ऑगस्टमध्ये पीएमआयचा निचांक