महाराष्ट्र

maharashtra

देशाच्या निर्यातीत १ ते १४ मार्चदरम्यान १७ टक्क्यांची वाढ

By

Published : Mar 16, 2021, 5:31 PM IST

देशात १ मार्च ते १४ मार्च दरम्यान आयातीचे प्रमाण हे २७.७७ टक्क्यांनी वाढून २२.२४ अब्ज डॉलर आहे. तर व्यापारी तूट ही ८.०२ अब्ज डॉलर आहे.

India export
भारत निर्यात

नवी दिल्ली - कोरोना महामारीच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असल्याचे चिन्हे दिसत आहेत. देशातील उत्पादनांच्या निर्यातीत मार्चमध्ये १७.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात १ मार्च ते १४ मार्चदरम्यान १४.२२ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे.

देशात १ मार्च ते १४ मार्च दरम्यान आयातीचे प्रमाण हे २७.७७ टक्क्यांनी वाढून २२.२४ अब्ज डॉलर आहे. तर व्यापारी तूट ही ८.०२ अब्ज डॉलर आहे. अभियांत्रिकी, तांदूळ, रत्नजडित खडे आणि मौल्यवान दागिने यांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. असे असले तरी कातडी उत्पादने, तेलबिया, रेडीमेड गारमेंट आणि वस्त्रोद्योग यांच्या उत्पादनात घसरण झाली आहे. सोने, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, मोती आणि मौल्यवान खड्यांच्या आयातीत वाढ झाली आहे.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ४५ रुपयांची वाढ

सलग तिसऱ्या महिन्यात देशाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. गतवर्षीच्या मार्चच्या तुलनेत निर्यात ०.६७ टक्क्यांनी वाढून २७.९३ अब्ज डॉलर आहे. फेब्रुवारीत वित्तीय तूट ही १२.६२ अब्ज डॉलर होती.

हेही वाचा-देशव्यापी संप: दुसऱ्या दिवशी विदेशी बँकांमधील कर्मचाऱ्यांचाही सहभाग

ABOUT THE AUTHOR

...view details