महाराष्ट्र

maharashtra

देशातील उत्पादनांच्या निर्यातीत ऑक्टोबरमध्ये ५.१२ टक्क्यांची घसरण

By

Published : Nov 14, 2020, 2:05 PM IST

एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १९.०२ टक्के घसरून होऊन १५०.१४ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. तर याच कालावधीत ३६.२८ टक्क्यांनी आयात घसरून १८२.२९ अब्ज डॉलरची आयात झाली आहे.

निर्यात
निर्यात

नवी दिल्ली- देशाच्या निर्यातीत ऑक्टोबरमध्ये घसरण होऊन २४.८९ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. सप्टेंबरमध्ये निर्यातीत वाढ झाली होती. पेट्रोलियम उत्पादने, रत्ने आणि दागिने, अभियांत्रिकी उत्पादने यांच्या निर्यातीत घसरण झाल्याने ऑक्टोबरमध्ये निर्यातीला फटका बसला आहे. दिलासादायक बाब म्हणजे व्यापारी तुटीचे प्रमाणही कमी झाले आहे.

ऑक्टोबरमध्ये व्यापारी तूट घसरून ८.७१ अब्ज डॉलर इतकी आहे. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये व्यापारी तूट ही ११.७५ अब्ज डॉलर इतकी होती. आयातीचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ११.५३ टक्क्यांनी घसरून ३३.६ अब्ज डॉलर राहिले आहे.

अशी झाली निर्यातीत घसरण

  • पेट्रोलियम उत्पादने - ५२ टक्के
  • काजू-२१.५७
  • रत्ने आणि दागिने - २१.२७
  • कातडी उत्पादने -१६.६७
  • लोकर-१२.८ टक्के
  • इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने ९.४
  • कॉफी-९.२ टक्के
  • सागरी उत्पादने-८ टक्के
  • अभियांत्रिकी उत्पादने -३.७५ टक्के

एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये ९.०२ टक्क्यांनी निर्याती घसरण-

एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १९.०२ टक्के घसरून होऊन १५०.१४ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. तर याच कालावधीत ३६.२८ टक्क्यांनी आयात घसरून १८२.२९ अब्ज डॉलरची आयात झाली आहे. कच्च्या तेलाची आयात ऑक्टोबरमध्ये ३८.५२ टक्क्यांनी घसरली आहे. एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाची आयात ४९.५ टक्क्यांनी घसरून ३७.८४ अब्ज डॉलर आहे. सलग सहा महिने निर्यात घसरल्यानंतर सप्टेंबरमध्ये ५.९९ टक्क्यांनी निर्यात वाढली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details