नवी दिल्ली - चालू वर्षात भारत इंग्लंडला मागे टाकून जगातील सर्वात मोठ्या पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज आयएचएस मार्किटने अहवालात व्यक्त केला. तर जपानला मागे टाकून २०२५ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असेही अहवालात म्हटले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देशापुढे आर्थिक आव्हाने उभी राहणार असल्याकडेही अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.
देशातील ग्राहक बाजारपेठ (कन्झ्युमर मार्केट) ही २०१९ मध्ये १.९ लाख कोटी डॉलर आहे. या प्रमाणात वाढ होवून २०२५ पर्यंत ३.६ लाख कोटी डॉलरची ग्राहक बाजारपेठ होईल, असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला. भारताची वाढती ग्राहक बाजारपेठ हे आशिया पॅसिफॅक भागाचे आर्थिक विकासाचे इंजिन ठरणार आहे. त्यामुळे आशियामध्ये प्रादेशिक व्यापार आणि गुंतणुकीचा ओघ वाढणार आहे.
- गुंतवणूक ही नवसंशोधन, उत्पादकतेचा वृद्धीदर वाढविणे आणि नव तंत्रज्ञान, नोकऱ्यांची निर्मिती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.
- पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात वाहतूक, उर्जा अशा पायाभूत सुविधांच्या बांधणीत लक्षणीय यश मिळाले आहे.
- अहवालात न्यायव्यवस्थेमधील रिक्त जागा भरण्याची शिफारस केली आहे.