महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

चिंताजनक! भारताचा विकासदर घटणार; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज - Indian GDP

भारताचा २०१९ मध्ये ७ टक्के  आणि २०२० मध्ये  ७. २ टक्के जीडीपी राहिल, असे आयएमएफने अहवालात म्हटले आहे. विकासदर कमी झाला तरी भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मान कायम टिकवेल, असे आयएमएफने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

By

Published : Jul 23, 2019, 8:07 PM IST

वॉशिंग्टन - भारताची अर्थव्यवस्था मंदावलेली असताना चिंतेत भर घालणारा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तविला आहे. आयएमएफने भारताचा विकासदर २०१९ व २०२० मध्ये कमी होईल, असा अंदाज वर्तविला आहे. या दोन्ही वर्षात पूर्वी वर्तविलेल्या अंदाजाहून भारताचे राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) ०.३ टक्क्याने कमी होईल, असे आयएमएफने अहवालात म्हटले आहे.


भारताचा २०१९ मध्ये ७ टक्के आणि २०२० मध्ये ७. २ टक्के जीडीपी राहिल, असे आयएमएफने अहवालात म्हटले आहे. विकासदर कमी झाला तरी भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा मान कायम टिकवेल, असे आयएमएफने म्हटले आहे. चीनहून मोठ्या फरकाने भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग पुढे राहिल, असेही आयएमएफने म्हटले आहे.

चीनची अर्थव्यवस्था मंदावली -


अमेरिकेबरोबरील व्यापारी युद्धानंतर चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. कमी झालेली मागणी आणि वाढत्या आयात शुल्काने चीनच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे चीनला वाढत्या कर्जावर नियंत्रण ठेवण्याची गरज आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी व्यक्त केली. जागतिक विकासदर हा २०१९ मध्ये ३.२ टक्के राहिल, असा अंदाज गोपीनाथ यांनी वर्तविला आहे. तर २०२० मध्ये ३.५ टक्के विकासदर राहिल, असा अंदाज वर्तविला आहे.

काय म्हटले आहे गोपीनाथ यांनी अहवालात?

  • व्यापारी वाद आणि तंत्रज्ञानामधील तणावाने जागतिक मागणी साखळीवर लक्षणीय परिणाम होईल, अशी त्यांनी भीती व्यक्त केली.
  • दोन देशांमधील व्यापार संतुलन राखण्यासाठी आयात शुल्काचा हत्यार म्हणून वापर करू नये.
  • बहुस्तरीय व्यापारी व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे आहे.
  • डिजीटल सेवा आणि तंत्रज्ञान हस्तांतरणसारख्या बाबींचे आधुनिकीकरण करण्याची आवश्यकता गोपीनाथ यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details