नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे प्राप्तीकर विभागाने आर्थिक वर्ष २०१९-२०या वर्षासाठी कर परताव्याचा अर्ज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करदात्यांना प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी वाढवून दिलेल्या मुदतीचा लाभ घेता येणार आहे.
प्राप्तीकर परताव्याच्या अर्जात होणार बदल; करदात्यांना वाढीव मुदतीचा होणार फायदा
विविध गुंतवणुकीसह ८० जी, एलआयसी यांच्या वजावटीसाठी वित्तीय अर्ज २०१९-२० वर्षासाठी कर परताव्याचे अर्ज भरण्याची मुदत ३० मार्चवरून ३० जून करण्यात आली आहे.
प्रतिकात्मक
प्राप्तीकर परताव्याचा नवीन अर्ज हा महिनाखेर अधिसूचित केला जाणार आहे. प्राप्तीकर परतावा अर्ज भरण्याची युटिलिटी ३१ मे रोजी उपलब्ध होणार आहे. विविध गुंतवणुकीसह ८० जी, एलआयसी यांच्या वजावटीसाठी वित्तीय अर्ज २०१९-२० वर्षासाठी कर परताव्याचे अर्ज भरण्याची मुदत ३० मार्चवरून ३० जून करण्यात आली आहे.
हेही वाचा-कोरोनाशी लढा; केंद्र सरकारकडून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारे पोर्टल लाँच