महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी १ लाख कोटीहून कमी; ऑक्टोबरमध्ये 'एवढे' झाले संकलन

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये जीएसटी हा १ लाख ७१० कोटी रुपये जमा झाला होता.  विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये सण असतानाही जीएसटीच्या संकलनाने १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला नाही.

संग्रहित - जीएसटी संकलन

By

Published : Nov 1, 2019, 5:15 PM IST

नवी दिल्ली - सलग तिसऱ्या महिन्यात जीएसटी १ लाख कोटी रुपयांहून कमी झाला आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ऑक्टोबरमध्ये ९५ हजार ३८० कोटी रुपये जमा झाला आहे.

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये जीएसटी हा १ लाख ७१० कोटी रुपये जमा झाला होता. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये सण असतानाही जीएसटीच्या संकलनाने १ लाख कोटींचा टप्पा ओलांडला नाही. चालू वर्षातील सप्टेंबरमध्ये ९१ हजार ९१६ कोटींचे कर संकलन झाले होते.

हेही वाचा-देशाच्या उत्पादन क्षेत्रात मंदावली हालचाल; गेल्या दोन वर्षात 'पीएमआय'ने नोंदविला निचांक

केंद्र सरकारने महसूल वाढविण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. तरीही कर संकलन कमी झाल्याने सरकारसाठी ही अडचणीची स्थिती असल्याचे ध्रुवा अॅडव्हायझरचे भागीदार अमित भगत यांनी सांगितले.
असे राहिले ऑक्टोबरमध्ये कर संकलन

  • सीजीएसटी - १७,५८२ कोटी रुपये
  • एसजीएसटी - २३,६७४
  • आयजीएसटी- ४६,५१७
  • उपकर - ७,६०७ कोटी

जीएसटीआर ४ बी परतावा भरण्यासाठी सप्टेंबरमध्ये एकूण ७३.८३ लाख जणांनी अर्ज भरले होते.

दरम्यान, चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केवळ ५ टक्के राष्ट्रीय सकल उत्पन्नाची नोंद झाली होती. त्यामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था असताना कर संकलन कमी झाल्याने अर्थव्यवस्था आणखी अडचणीत पडेल, अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details