नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) केंद्र सरकारला येणारा मार्च महिन्यातील महसूल 97 हजार 597 कोटी इतका राहिला. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात महसुलात घट नोंदली गेली. फेब्रुवारी महिन्यात 1.05 लाख कोटी रुपये महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला होता. गेल्या महिन्याच्या तुलनेत 19 हजार 183 कोटींची तूट आली आहे.
मार्च महिन्याच्या जीएसटी संकलनात घट - मार्च महिन्याच्या जीएसटी संकलनात घट
वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) केंद्र सरकारला येणारा मार्च महिन्यातील महसूल 97 हजार 597 कोटी इतका राहिला. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात महसुलात घट नोंदली गेली.
जीएसटी
राज्यांचा जीएसटी 25 हजार 601 कोटी आणि एकात्मिक जीएसटी 44 हजार 508 कोटी, तर यामध्ये आयातीवरील संकलित 18 हजार 056 कोटी रुपयांचा समावेश आहे, असे वित्त मंत्रालयाकडून बुधवारी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
31 मार्च 2020पर्यंत दाखल केलेल्या जीएसटीआर-3 बी रिटर्न्सची एकूण संख्या 76.5 लाख इतकी आहे.