नवी दिल्ली- अर्थव्यवस्थेचा दर मंदावला असताना वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन कमी झाल्याने सरकारची चिंता आणखीवाढणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये २ टक्के वस्तू व सेवा कराचे संकलन झाले आहे. सप्टेंबरमध्ये ९१ हजार ९१६ कर संकलन झाल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले.
सलग दुसऱ्या महिन्यात सप्टेंबरमध्ये १ लाख कोटींहून करसंकलन कमी झाले आहे. ऑगस्टमध्ये वस्तू व सेवा करसंकलन ९८ हजार २०२ कोटी रुपये होते. त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ६ हजार २८७ कोटी रुपयांचे करसंकलन कमी झाले आहे.
हेही वाचा-कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा केंद्राचा निर्णय; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
सप्टेंबरमध्ये असे झाले आहे करसंकलन (कोटी रुपयामध्ये)
केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) - १६,६३०
राज्य जीएसटी (स्टेट जीएसटी) - २२,५९८
एकत्रित जीएसटी - (इंटिग्रेटेड जीएसटी) - ४५,०६९
उपकर (सेस) - ७,६२०