नवी दिल्ली - पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेच्या सर्व आर्थिक व्यवहारावर आरबीआयने सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू केले आहेत. याबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे. तसेच अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी उत्कृष्ट प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
निर्मला सीतारामन यांनी पीएमसी बँकेबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, की सध्या, आरबीआयकडून पीएमसी बँकेचे प्रकरण हाताळण्यात येत आहे. एकत्रित, व्यापक असे चित्र समोर येऊ द्या. त्यानंतर बाधित लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार पावले उचलणार आहे.
हेही वाचा-खातेधारकांची पीएमसी बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी