नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी (मनरेगा) अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. या निधीमुळे घरी परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांना रोजगार मिळू शकणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
आर्थिक पॅकेजचा चौथा टप्पा जाहीर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मनरेगासाठी अतिरिक्त निधी जाहीर केला आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पात मनरेगासाठी ६१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.