महाराष्ट्र

maharashtra

देशामध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी मंदी येणार - गोल्डमन सॅच्सचा अंदाज

By

Published : May 18, 2020, 8:55 PM IST

गोल्डमॅन सॅच्सच्या अंदाजानुसार देशाचा जीडीपी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ४५ टक्क्यांनी घसरणार आहे. यापूर्वी 'गोल्डमॅन'ने जीडीपीत २० टक्के घसरण होईल, असा अंदाज केला होता

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चिंताजनक बातमी आहे. कोरोनाच्या प्रसाराला आटोक्यात आणण्यासाठी सुरू असलेल्या टाळेबंदीचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. बँक गुंतवणूक आणि वित्तीय सेवा देणाऱ्या गोल्डमॅन सॅच्सच्या अंदाजानुसार भारताला आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार आहे.

गोल्डमॅन सॅच्सच्या अंदाजानुसार देशाचा जीडीपी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ४५ टक्क्यांनी घसरणार आहे. यापूर्वी 'गोल्डमॅन'ने जीडीपीत २० टक्के घसरण होईल, असा अंदाज केला होता. असे असले तरी तिसऱ्या तिमाहीत २० टक्के सुधारणा होईल, असा अंदाज आहे. चौथ्या तिमाहीत १४ टक्के सुधारणा तर पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ६.५ टक्के सुधारणा होईल, असा अंदाज केला आहे.

हेही वाचा-केंद्र सरकारने पुन्हा सुधारित आर्थिक पॅकेज घोषित करावे- काँग्रेसची मागणी

गोल्डमॅन सॅच्सने देश आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या मंदीला देश सामोरे जाणार असल्याचे म्हटले आहे. त्याचा परिणाम म्हणून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताचा रियल जीडीपी ५ टक्क्यांनी घसरणार आहे. बर्नस्टे या ब्रोकेज कंपनीनी २० लाख कोटींचे पॅकेज हे ध्येय नसलेले आणि संधी गमाविलेले पॅकेज असल्याचे म्हटले आहे. आर्थिक पॅकेजमध्ये केलेल्या घोषणा या सर्वासाधारण आर्थिक अजेंडाचा भाग असल्याचेही बर्नस्टेने म्हटले आहे.

हेही वाचा-GRAPHICS : जाणून घ्या, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेले आर्थिक पॅकेज

ABOUT THE AUTHOR

...view details