नवी दिल्ली - एनडीए सरकार पुन्हा सत्तेत येत असताना अर्थव्यवस्थेबद्दलची चिंताजनक आकेडवारी समोर आली आहे. जानेवारी-मार्च २०१८-२०१९ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाची (जीडीपी) ५.८ टक्के नोंद झाली आहे. हे जीडीपीचे प्रमाण गेल्या पाच वर्षात सर्वात कमी आहे.
अर्थव्यवस्थेची घसरगुंडी..! गेल्या पाच वर्षात जीडीपीचा निचांकी दर.. - India economic growth
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकेडवारीनुसार आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचे प्रमाण ६.८ टक्के होते.
प्रतिकात्मक
केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकेडवारीनुसार आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये राष्ट्रीय सकल उत्पन्नाचे प्रमाण ६.८ टक्के होते. विशेष म्हणजे त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात तुलनेने अधिक म्हणजे ७.२ टक्के जीडीपीचे प्रमाण होते. यापूर्वी आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्येदेखील ६.४ टक्के एवढ्या कमी जीडीपीची नोंद झाली आहे. जगात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी भारताची अर्थव्यवस्था आहे.