नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतीय हवाई क्षेत्राच्या वापरातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. त्यामधून नागरी विमान वाहतूक क्षेत्राला १ हजार कोटींचा लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजमध्ये आठ क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या सुधारणा जाहीर केल्या आहेत. देशातील केवळ ६० टक्के हवाई क्षेत्र नागरी विमान वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. अधिक हवाई क्षेत्र उपलब्ध झाल्यास प्रवासाची वेळ आणि इंधन बचत होणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. देशातील सहा विमानतळांचे खासगीकरण करण्यात येणार आहे.