हैदराबाद- मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवरून मोदी सरकारवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन टीका केली आहे. सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने अर्थव्यवस्थेऐवजी सामाजिक आणि राजकीय मोहिमेवर लक्ष केंद्रित केल्याचे राजन यांनी म्हटले आहे.
रघुराम राजन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका केली. ते म्हणाले, की निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर सध्याच्या सरकारने दुर्दैवाने त्यांच्या राजकीय आणि सामजिक मोहिमा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले. सरकारने अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले नाही.
हेही वाचा-बीएस-६ इंजिन क्षमतेच्या वाहनांचे पेट्रोल-डिझेल १ एप्रिलपासून महागणार
नोटाबंदी आणि खराब पद्धतीने वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) केलेल्या अंमलबजावणीनंतर अर्थव्यवस्था मंदावली आहे . सुधारणा करतानाही दुर्दैवाने वित्तीय क्षेत्राकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे दुर्दैवाने विकासदर मंदावला आहे.
हेही वाचा-शेअर बाजार १,४४८ अंशांनी कोसळला; आयटी कंपन्यांना फटका
रघुराम राजन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत माजी अर्थतज्ज्ञाची भूमिकाही बजावली आहे. ते म्हणाले, वेळेवेर लक्ष दिले असते व योग्य कृती केली असती तर परिस्थिती बदलू शकते, असे मत राजन यांनी व्यक्त केले. वित्तीय संस्थांची कर्ज देण्याची क्षमता मर्यादित आहे. हेदेखील देशाच्या आर्थिक विकासाचा दर मंदावण्याचे कारण असल्याचे राजन यांनी म्हटले.