मुंबई- नफ्यातील सार्वजनिक कंपन्यांमधील हिश्याची सरकारकडून विक्री करण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नफा अथवा तोट्याच्या आधारावर निर्गुंतवणूक ठरत नसल्याचे उत्तर दिले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारला होता.
निर्गुंतवणूकीचे निकष हे नीती आयोगाकडून निश्चित करण्यात येत असल्याचे केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत सांगितले. निर्गुंतवणुकीसाठी राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौम कार्य, बाजारातील कमतरता आणि सार्वजनिक हेतुचा विचार करण्यात येतो. सरकार निर्गुंतवणुकीच्या धोरणाचा अवलंब करते. सार्वजनिक कंपन्यांचे उद्योग हे आमचे मुलभूत क्षेत्र नाही, असेही ठाकूर यांनी संसदेमध्ये सांगितले.