नवी दिल्ली- केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक असल्याचे केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे. विदेशी गुंतवणुकदारांसाठी भारत हा अत्यंत आकर्षक केंद्र होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
केंद्रीय राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत सरकारने लागू केलेल्या आर्थिक सुधारणांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) महागाईचा दर हा १२ टक्के होता. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) महागाईचा दर हा २ ते ३ टक्क्यांहून कमी झाला आहे. काही अर्थतज्ज्ञ कमी असलेला महागाईचा दर हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगला नसल्याचे दावा करत आहेत. सरकारने काही वस्तुंच्या वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. त्याचा फारसा (अर्थव्यवस्थेवर) परिणाम होणार नाही.