नवी दिल्ली- देशातील प्रमुख आठ उद्योगांचा जानेवारीत २.२ टक्के वृद्धीदर राहिला आहे. कोळसा, शुद्धीकरण उत्पादने आणि वीज निर्मिती वाढल्याने हा वृद्धीदर नोंदविल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.
पायाभूत क्षेत्रांचा जानेवारी २०१९ मध्ये वृद्धीदर १.५ टक्के राहिला आहे. कोळसाचे उत्पादन ८ टक्के, शुद्धीकरणाचे उत्पादने १.९ टक्के आणि वीज निर्मितीचे उत्पादने यांचा २.८ टक्के असा जानेवारीत वृद्धीदर राहिला आहे. मात्र, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि खतांच्या उत्पादनात घसरण झाली आहे.
हेही वाचा-'अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून सरकारचे सामाजिक आणि राजकीय मोहिमेकडे लक्ष केंद्रित'
चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारीदरम्यान प्रमुख क्षेत्रांचा वृद्धीदर हा केवळ ०.६ टक्के राहिला आहे. तर मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारीदरम्यान प्रमुख आठ क्षेत्रांचा वृद्धीदर हा ४.४ टक्के होता. प्रमुख आठ क्षेत्रांचे उत्पादन ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान घसरले होते.
हेही वाचा-चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विकासदर ४.७ टक्के; सात वर्षातील निचांक
दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा विकासदर (जीडीपी) ४.७ टक्के नोंदविण्यात आला आहे. ही आकडेवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केली आहे. हा गेल्या सात वर्षातील जीडीपीचा नीचांक आहे.