महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 14, 2020, 7:12 PM IST

ETV Bharat / business

महागाईबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवा; काँग्रेसची पंतप्रधानांकडे मागणी

काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, एका महिन्यात महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे काय रोडमॅप आहे, हे पंतप्रधानांनी देशाला सांगावे. पंतप्रधान हे दुफळी करणारे वक्तव्य करण्यात व्यस्त आहेत. ते देशासमोर असलेल्या मूलभुत समस्या सोडवित नाहीत.

Randeep Surajewala
रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली- महागाईने गेल्या पाच वर्षात उच्चांक केला आहे. अशा स्थितीत विरोधी पक्ष नेत्यांची बैठक बोलवावी, अशी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. त्या बैठकीत महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने रोडमॅप द्यावा, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, एका महिन्यात महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडे काय रोडमॅप आहे, हे पंतप्रधानांनी देशाला सांगावे. पंतप्रधान हे दुफळी करणारे वक्तव्य करण्यात व्यस्त आहेत. ते देशासमोर असलेल्या मूलभूत समस्या सोडवित नाहीत.

डिसेंबरमध्ये किरकोळ बाजारपेठेतील महागाई गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढून ७.३५ टक्के झाली आहे. पालेभाज्यांच्या किमतीने ही उच्चांक गाठला आहे. देशातील २० विरोधी पक्ष नेत्यांनी ठराव मंजूर केला. यामध्ये म्हटले आहे, की केंद्र सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचे संपूर्णपणे चुकीचे व्यवस्थापन केल्याने सर्वसामान्यांच्या जीवनमानाचा दर्जा बिघडत आहे.

हेही वाचा-बजाजची चेतक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; दोन हजार रुपयात करता येणार बुकिंग

आर्थिक संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या टोकावर पोहोचली आहे. त्यासोबत देशाचे राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा विकासदर हा विक्रमी घसरला आहे. तर गेल्या पन्नास वर्षात सर्वाधिक बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे ठरावात म्हटले आहे. विविध समस्यांवर तोडगा न काढता भाजपकडून सामाजिक दरी रुंदावण्याचे आणि लोकशाही हक्कांवर हल्ला करण्याचे काम होत असल्याचे विरोधी पक्षाने म्हटले आहे.

हेही वाचा-आयात कांद्याने वाढविली केंद्र सरकारची चिंता, कारण...

ABOUT THE AUTHOR

...view details