बीजिंग - कोरोनाच्या संकटाने चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर १९७६ नंतर पहिल्यांदाच चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घसरला आहे. ही विकासदरातील घसरण ६.८ टक्के एवढी आहे.
चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅस्टिक्सने (एनबीएस) राष्ट्रीय सकल उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार पहिल्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था २ हजार ९१६ अब्ज डॉलरची होती. हे प्रमाण मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ६.८ टक्क्यांनी कमी होते. चीनने १९९२ पासून राष्ट्रीय सकल उत्पादनाची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी चीनमध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार ४० वर्षात प्रथमच चीनचा विकासदर घसरला आहे.