महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंद्रीय जीएसटीत एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये ४० टक्क्यांची घट

चालू वर्षात एप्रिल-नोव्हेंबरदरम्यान ३ लाख २८ हजार ३६५ कोटींच्या केंद्रीय जीएसटीचे संकलन झाले आहे. तर प्रत्यक्षात केंद्रीय जीएसटी ५ लाख २६ हजार कोटी रुपये होईल, असा अर्थसंकल्पात अंदाज होता.

By

Published : Dec 10, 2019, 4:20 PM IST

Updated : Dec 10, 2019, 4:38 PM IST

Anurag Thakur
केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर

नवी दिल्ली - अर्थसंकल्पातील अंदाजाहून केंद्रीय जीएसटीचे (सीजीएसटी ) संकलन एप्रिल-नोव्हेंबरमध्ये ४० टक्क्यांनी घटले आहे. ही माहिती केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये दिली.

चालू वर्षात एप्रिल-नोव्हेंबरदरम्यान ३ लाख २८ हजार ३६५ कोटींच्या केंद्रीय जीएसटीचे संकलन झाले आहे. तर प्रत्यक्षात केंद्रीय जीएसटी ५ लाख २६ हजार कोटी रुपये होईल, असा अर्थसंकल्पात अंदाज होता.

हेही वाचा -हिरो मोटोकॉर्पच्या वाहनांच्या किमती जानेवारीत २ हजार रुपयापर्यंत वाढणार

अनुराग ठाकूर म्हणाले, वस्तू व सेवा करामधील करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी तपास यंत्रणेत नवे बदल करण्यात आले आहेत. सीबीआयसी अंतर्गत विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन (डीजीएआरएम) महासंचालनालयाची स्थापना करण्यात आली आहे. यामधून ई-वे बिल पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. इनपूट टॅक्स क्रेडिटवर मर्यादा घातल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

Last Updated : Dec 10, 2019, 4:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details