नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशामधील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार केवळ कर मिळविण्याकरता जनतेला महागाईच्या दलदलीमध्ये ढकलत आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, महागाई हा शाप आहे. केंद्र सरकार केवळ जनतेला महागाईच्या दलदलीमध्ये ढकलत आहे. देशाच्या विनाशाविरोधात तुमचा आवाज उठवा. वाढत्या किमतीविरोधातील मोहिमेत सहभागी होऊन बोला. ट्विटबरोबर राहुल गांधी यांनी निदर्शने करणाऱ्या लोकांचा व्हिडिओही जोडलेला आहे.