नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज भारत ब्राँड एक्सजेंच ट्रेडेड फंड (ईटीएफ) लाँच करण्याला मंजूरी दिली आहे. ईटीएफ लाँच केल्याने भारत वित्तीय स्वरुपात अधिक सक्रिय अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्मला सीतारामन म्हणाल्या, केंद्र सरकार रोख्यांची बाजारपेठेचा अधिक विस्तार करू इच्छित आहे. ईटीएफमुळे सरकारी संस्था आणि कंपन्यांना अतिरिक्त निधी मिळू शकणार आहे. भारत बाँड एक्सेंज ट्रेडेड फंड हा देशातील पहिला कॉर्पोरेट बाँड आहे. यापूर्वी केंद्र सरकारने २०१४ ला पहिल्यांदा इक्विटी ईटीएफ लाँच केला होता. त्या सरकारी रोख्यांना गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानंतर भारत-२२ ईटीएफलाही गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.