नवी दिल्ली- गेल्या काही तिमाहीत आर्थिक परिस्थिती आणि व्यवसायांसाठी वातावरण वाईट झाल्याचे 'एनसीएईआर'च्या सर्व्हेमध्ये दिसून आले. व्यवसाय विश्वास निर्देशांक मागील तिमाहीच्या तुलनेत ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या तिमाहीत १५.३ टक्क्यांनी घसरला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्ट-ऑक्टोबरमध्ये सर्वच क्षेत्रातील विश्वास निर्देशांक हा २२.५ टक्क्यांनी घसरला आहे. एनसीएईआरचा (नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च) व्यवसाय विश्वास निर्देशांक (बीसीआय) हा भारतीय उद्योगाच्या सर्वच क्षेत्रातील भावना दर्शवित असतो. एनसीएईआरने ६०० भारतीय कंपन्यांचा सर्व्हे करून निष्कर्ष जाहीर केले आहेत.
सर्व आर्थिक स्थिती येत्या सहा महिन्यात सुधारेल का, या प्रश्नाला सर्वात अधिक नकारात्मक उत्तर मिळाले आहे. एनसीएईआरच्या माहितीनुसार जुलै २०१९ मध्ये सकारात्मक उत्तरांचे प्रमाण हे ५८.९ टक्के होते. हे प्रमाण ऑक्टोबर २०१९ मध्ये घसरून ४६.३ टक्के झाले आहे.